शबनम न्यूज | मावळ
पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी कशाळ गावातील विविध विकास कामासंदर्भात पुणे जिल्हा कृषी पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव आप्पा वायकर तसेच पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला ताई पानसरे यांची भेट घेण्यात आली,
यावेळी सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस मा. सरपंच विठ्ठलराव जाधव तसेच नारायण मालपोटे, मा.सरपंच शरदराव जाधव, मा.उपसरपंच तुकाराम जाधव. तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ जाधव, सोशल मीडिया उपाध्यक्ष मावळ तालुका मंगेश जाधव, तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष सुखदेव जाधव, मा,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष ओ.बी.सी सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदर मावळ भाऊ सुतार उपस्थित होते,
श्रीमळुबाई मंदिर कशाळ येथे काँक्रिटीकरणासाठी 3लक्ष रुपये,निधी दिल्याबद्दल सभापती बाबुराव आप्पा वायकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला, जिल्हा परिषदेच्या वतीने पुढील काळात कशाळ गावासाठी भरीव निधी देणार असल्याचे बाबुराव आप्पा वायकर यांनी सांगितले बरेच वर्ष प्रलंबित असलेला कशाळ येथील समाज मंदिराच्या कामासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी आश्वासन दिले,