शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही व शिक्षण विभागाचे नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या. नगरसेविका शिक्षण समिती सदस्या प्रियांका बारसे यांनी आयुक्तांपुढे मांडले मत.
दिलेल्या निवेदनात शिक्षण सदस्या नगरसेविका प्रियांका बारसे म्हणतात,
पिची मनपा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव मंजूर केला असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे मला शिक्षण विभागातून समजले.
आता दहा वर्षानंतर शिक्षकबदली होत असताना सर्वात जास्त सर्व्हिस असलेल्या शिक्षकांचा प्रथम आपण विचार करावा .
बदल्या करताना ऑनलाईन करणार की ऑफलाईन होणार?
ऑनलाईन बदली करताना कोणते निकष वापरले जाणार याबाबत आम्हाला माहिती द्यावी
ऑफलाइन जर करणार असाल तर शिक्षकांच्या राहण्याचा पत्ता, त्यांचे वय व वयानुसार असणारा एखादा दीर्घकालीन आजार तसेच सकाळ विभागातून दुपार विभागात बदली न करणे या बाबींचा विचार केला जावा.
कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी अस मला वाटतं असं नगरसेविका बारसे यांनी म्हटले आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे शिक्षकबदली प्रकरणात शिक्षण विभागाचे नाव खराब होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावयाची आहे हे लक्षात घेऊनच आपण या बदली प्रस्तावाच्या कार्यवाहीस सुरुवात करावी असे मत नगरसेविका व शिक्षण समिती सदस्या प्रियांका बारसे यांनी आयुक्त राजेश पाटील व उपायुक्त शिक्षण विभाग खोत यांच्यापुढे मांडले।