शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील औंध – रावेत या रस्त्याचे सुशोभीकरण करून आवश्यक ठिकाणी विकसित करण्यात यावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नाना काटे यांनी नमूद केले आहे की औंध – रावेत हा रस्ता म्हणजे पुणे ते पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा दुवा आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी पुणे ते औंध मार्गे रावेत आणि तेथून एक्स्प्रेस हायवेला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने या रस्त्याचा उपयोग करत असतात. त्यामुळे औंध रावेत रस्त्याचे चांगल्याप्रकारे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच काही ठिकाणी हा रस्ता आवश्यकतेनुसार विकसित करून दुरुस्त करण्यात यावा. जेणेकरून नागरिकांना या रस्त्याने प्रवास करताना कसल्याही समस्या उद्भवणार नाही. तरी माननीय आयुक्त महोदय या रस्त्याबाबत आपल्या महापालिकेच्या सबंधित विभागाला या रस्त्याची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी अशा सूचना देण्यात याव्या.