शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
भोसरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील आयुष तापकीर या सदगुरुनगर, भोसरी येथे राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाने तलावात बुडणाऱ्या तीन मुलांना पाहिले आणि प्रसंगावधान राखून मोठ्या धाडसाने आणि शौर्याने त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यामुळे त्यातील तिघांचा जीव वाचला या त्याच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्याचा भोसरी विधानसभा मतदारसंघातील युवानेते प्रज्योत फुगे यांनी सन्मान केला यावेळी आयुष्य तापकीर ला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले
भोसरी परिसरात मागील आठवड्यामध्ये तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर तेरा वर्षीय मुलाने तीन जणांचे प्राण वाचविले हा 13 वर्षीय मुलगा आयुष्य तापकीर याने तीन जणांचे प्राण वाचविले तलावामध्ये चार मुले पोहोण्यासाठी गेली होती त्यावेळी तेथील खोल खड्डा याचा अंदाज न आल्याने ती मुले बुडू लागली ही बाब आयुष च्या निदर्शनास आली त्यानंतर त्याने तलावाच्या दिशेने धाव घेतली संदीप, ओमकार आणि ऋतुराज या तिघांना आयुष तापकीर याने पाण्याबाहेर काढले व या तिन्ही मुलांचे प्राण वाचविले
आयुष तापकीर या मुलाचे धाडस पाहून सर्वत्र आयुष तापकीर से अभिनंदन होत आहे त्याच्या धाडसामुळे व त्याचे चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर त्यांनी तीन जणांचे प्राण वाचविले त्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदारसंघातील युवानेते प्रज्योत फुगे यांनी आयुष याचा सन्मान केला