शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड मार्फत ऑक्टोबरमध्ये पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन केले असल्याचे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
Advertisement
खेड येथे 5 ते 6 ऑक्टोबर 2021 , मंचर येथे 12 ते 13 ऑक्टोबर 2021, जुन्नर येथे 20 ते 21 ऑक्टोबर 2021, वडगाव मावळ येथे 26 ते 27 ऑक्टोबर 2021 रोजी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्की अनुज्ञप्तीसाठी उपलब्ध 90 चा कोटा असून तो 4 ऑक्टोबर रोजी 5 वाजता उपलब्ध होणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी अपॉईटमेंट घेतलेल्या वेळेतच हजर रहावे. जेणेकरुन गर्दी टाळणे शक्य होईल. तसेच सामाजिक अंतर पाळावे व मास्क, हातमोजे व सॅनिटायजर याचा वापर करावा, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
Advertisement