शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
आझादी का अमृत महोत्सव निमीत्त शहरातील नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासाठी तसेच स्वातंत्र्यासाठी लढा देणा–या सैनिकांना आदराजंली म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रिय प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील व क्षेत्रिय अधिकारी सोनम देशमुख यांच्या संकल्पनेतून देशभक्तीपर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. तिरंगा व अशोक चक्राचे महत्व, देश स्वातंत्र्यापासून देशाने आजपर्यंत तंत्रज्ञानात संपादन केलेले यश दर्शविणारी सॅटेलाईट प्रतिकृती डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरी, आकुर्डी येथे उभारण्यात आली. तसेच, जुन्या सिडयांचा वापर करून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.
सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ इंजिनिअरींच्या ८० विद्यार्थ्यांच्या सहभागातून दर्शन हॉल समोरील भिंतीवर विविध कलाकृती साकारण्यात आल्या आहे. तसेच, प्रेमलोक पार्क, दर्शन हॉल, डीवाय पाटील कॉलेज येथे जेष्ठ नागरिकांसाठी जुन्या टायरर्सपासून बैठक व्यवस्था करण्यात आली. तसेच, साई वुड सोसायटीमधील चिमुकल्यांनी महोत्सवात सहभाग घेत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. महोत्सवानिमीत्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यानी उत्स्फुर्त सहभाग घेतला. देश स्वातंत्र्यांचे महत्व पटवून देणा–या संकल्पनांची आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, आयक्त राजेश पाटील अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पाहणी केली. यावेळी, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक सचिन चिंचवडे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, प्रज्ञा खानोळकर, राजश्री गावडे, स्विकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, क्षेत्रिय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.