शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे संयुक्त विद्यमाने थेरगाव येथील ग क्षेत्रिय कार्यालयाअंगर्तत २४ मी. डी.पी. पदपथावर प्लेस मेकिंग माध्यमातून लहान मुलांसाठी मिनी सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाची सूरूवात सायकल क्रिडा प्रकार, पदपथावर टेन्सिल पेंटिंग , पोवाडा गायनाने झाली. या उपक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदविला.
ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्याहस्ते फित कापून कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी नगरसेवक कैलास बारणे, स्विकृत सदस्य गोपाळ मळेकर, संदिप गाडे, राजीव गांधी निराधार समिती अध्यक्ष नरेंद्र माने, ग क्षेत्रीय अधिकारी तथा सहा.आयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता देवना गवार, कार्यकारी अभियंता गलबले, मुख्याध्यापक कदम सर, आहेर सर , आटोळे सर , मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, राजु बेद, उपअभियंता स्थापत्य संध्या बाघ, कनिष्ठ अभियंता अतुल जोशी, कनिष्ठ अभियंता विद्युत सतिश तायडे आदी उपस्थित होते. थेरगाव म.न.पा. शाळेतील कबड्डी क्रिडा प्रकारात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेल्या मुलींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.