शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना या संसग॔जन्य रोगाचा प्रादुर्भाव होवू नये तसेच आपल्या संस्कृतीचा वारसा जपणे त्याचप्रमाणे कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता आई प्रतिष्ठान दापोडी तसेच स्वीकृत सदस्य अनिकेत राजेंद्र काटे यांच्या वतीने भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2021 या काय॔क्रमाचे दिनांक 10/09/2021 ते 18/09/2021 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 210 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी,सांगवी,बोपोडी,मोशी ,निगडी भागातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विठ्ठल मंदिर सभामंडप वरील आळी दापोडी पुणे 12. या ठिकाणी शुक्रवार दिनांक 1/10/2021 रोजी उत्साहात संपन्न झाला.
प्रथम क्रमांक अनिल गोपाळ जाधव दापोडी (फ्रीज) , व्दितीय क्रमांक सचिन महादेव दांगट (LED T.V) , तृतीय क्रमांक सचिन शंकर पिल्ले फुगेवाडी (मायक्रो ओव्हन) त्याचप्रमाणे विशेष पारितोषिक चतुर्थ क्रमांक सायली काळुराम लांडगे कासारवाडी, पाचवा क्रमांक किरण कैलास दैवाळ जुनी सांगवी , सहावा क्रमांक सुजल गणेश भोंडे दापोडी
सातवा क्रमांक जीवन भगवान महाडिक जुनी सांगवी , आठवा क्रमांक पुजा बळीराम देवकुळे यांना प्रत्येकी मिक्सर देवून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धेकास सन्मान चिन्ह देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काय॔क्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष काटे,सत्यवान (बाबू) काटे,सज्जन कणसे, सुभाष (आबा)बोधे, विलासआण्णा काटे, चंद्रकांत काटे पोलीस पाटील,दिपक काटे,ज्ञानेश्वर भाडाळे,हभप सोपान नाना भाडाळे,नंदकुमार वाखारे, दत्तात्रय गावडे,शिवाजी काटे,नंदकुमार (बापू) कणसे,सोपान काटे,सुरेश किंडरे, साहेबराव बोत्रे, यशवंत बोधे,अशोक जाधव,विजय किंडरे, कैलास कंधारे, चंदकांत वाखारे,भानुदास शिवले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत मोरे (मामा) सुभाष शहा,चंदकांत पतंगे,मोहन ताकवणे तसेच मोठ्या संख्येने महिला वग॔ काय॔क्रमास उपस्थित होते.या स्पर्धेतील पय॔वेक्षक म्हणून विजय दिक्षीत (सर) यानी कामकाज पाहिले. तसेच काय॔क्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले,त्याचप्रमाणे सुनिल मोरे यांनी आभार मानले.