शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
देश स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अनेक स्वातंत्र्य संग्राम, चळवळींमधून देशाचा आवाज एक झाल्याने पाश्चिमात्य सत्तांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला. अशाच संघटनात्मक कार्यातून गेल्या ७५ वर्षात देशाच्या विकासाला चालना मिळाली असून देशाने सर्वच क्षेत्रामध्ये नावलौकिक केले. पिंपरी चिंचवड शहराचा विकास देखील संघटनात्मक कार्यातून उभारला जात असल्याचे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. आझादी का अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम आज सकाळी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पार पडला. याप्रसंगी, महोत्सवात सहभागी होणा-या डॉक्टर, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, हौसिंग सोसायटी प्रतिनिधी आदींचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमावेळी, व्यासपीठावर सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष विठठल भोईर, अतिरिक्त आयुक्त (१) विकास ढाकणे, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क विभाग प्रमुख अण्णा बोदडे, ब प्रभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी यांच्यावतीने सर्व क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत १ ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत सलग ७५ तास आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या थीम्सनुसार झालेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध घटकांनी सहभाग घेवून देश स्वातंत्र्यांचा आनंदोत्सव साजरा केला. यामध्ये, ७५ तास लसीकरण, फन अँड फिटनेस, कराटे, योगा, पथनाट्य, कथा कथन, संगीत कार्यक्रम, अग्निशमन प्रात्यक्षिक, भरत नाट्य, मर्दानी खेळ, एरोबिक्स, संगीत कार्यक्रम, पुस्तक वाटप, आयसीसीसी व्हिसिट, एकपात्री प्रयोग, किक बॉक्सिंग, जिम्नाशियम, ई वेस्ट संकलन, नदी स्वच्छता, होम कंपोस्टिंग जनजागृती, ७५ जागांची स्वच्छता, ई वेस्ट संकलन, ७५ आयुर्वेदिक वृक्षांचे रोपण, दुर्मिळ वृक्षांचे रोपण, नदी घाटांची स्वच्छता, गुणवत्ता विकास कार्यशाळा, शिक्षकांसाठी पाणीपुरवठा व्यवस्थापन कार्यशाळा, ई वेस्ट संकलन, वाहतूक नियोजन, ७५ आयुर्वेदिक नक्षत्र वृक्ष लागवड, वृक्षारोपण, महाआरोग्य शिबीर, रक्तदान, सायक्लोथॉन, पोस्टर फ्री शहर, ७५ वंचित मुलांचा शाळाप्रवेश, महिला सुरक्षा जनजागृती, ७५ ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी हेपटाइटिस बी लसीकरण, पोस्टर व खिळेमुक्त झाडे अभियान, आरोग्य तपासणी, मोबाईल ऍप वापर, रक्तदान शिबीर, लसीकरण मोहीम व शालेय साहित्य वाटप, स्वच्छ भारत अभियान, प्लॉगॅथॉन, ७५ मुलांना स्वातंत्र्यवीरांच्या पुस्तकांचे वाटप, ७५ मुलांचे मानसिक आरोग्य शिबीर, ई वेस्ट संकलन, ७५ दिव्यांगांचा प्लेस मेकिंग (वॉल पेंटिंग), डेंग्यू मुक्त सोसायटी अभियान, ७५ बर्ड फिडर आणि ७५ किलो कंपोस्टचे वाटप, ७५ पोलिसांना मेडिकल किट्सचे वाटप, आरोग्यविषयी जनजागृती, सायक्लोथॉन, स्मार्ट स्ट्रीट पोल (डास निर्मूलन तंत्र), चित्रकला स्पर्धा, गेम्स, ग्रंथालयाचे उदघाटन, पोस्टर आणि रांगोळी स्पर्धा, म्युझिकल नाईट, ऑनलाईन निबंध स्पर्धा यासह विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व घटकांचा सत्कार समारंभ आज पार पडला.
सत्कारार्थी विद्यार्थी व व्यक्ती : –प्रजेस गायकवाड, ओंकार बळीराम सीतापूरे, आदित्य सोनटक्के, राजरत्न पांडागळे, पुष्पराज ननावरे, आदित्य चव्हाण, कृष्ण जयधने, तेजस यादव, यश शिंदे, अनिकेत सोनकांबळे, अस्लम इब्राहीम शेख, श्रेयश भोसले, ग्रीशा कुऱ्हाडे, तन्मय शिंदे, साईप्रसाद चिल्लाळ, दिनेश ठोंबरे, लक्ष्मी वाहूरवाघ, साक्षी त्रिंबके, श्रीतेज टिळेकर, संस्कार पाटील, वैष्णवी चव्हाण, कावेरी जैनजांगडे, यश गायकवाड, रक्षिता गोत्सुर्वे, श्रुती शिंदे, तेजश्री धांडे, श्रद्धा शिंदे, योगिता सोनावणे, जान्हवी आर.गोएंका, चेतना जंगले, आरोही लोहार, ऋतुजा शिंदे, जान्हवी बेंगळे, स्वरा चावण, साईनाथ लवंडे, रोषन भांडारकर, दिनेश ठोंबरे, सोहम कुरवरे, चौधरी इकरा मोहम्मद कासीम, संस्कृती जगताप, तनिष्का पवार, रोहन मांडवकर, ऐश्वर्या रोकडे, संस्कृती पाखंडे, प्रतीक्षा कांबळे, उज्वला वासाळे, आसीया अल्ताफ इनामदार, पल्लवी तिवारी, परीक्षित चव्हाण, अजय धोत्रे, अनाया मुखर्जी, मनीष पांचाळ, प्रतिक्षा चिपडे, अंकिता नाटेकर, चंदन सोनकांबळे, प्रीतम पांडागळे यांचा सत्कार झाला.
सत्कारार्थी संस्थांची नावे :- पिंपरी चिंचवड कराटे असोसिएश, पतंजली योग समिती, जयंदु मातोश्री प्रोडक्शन, पुणे, पिंपरी चिंचवड साहित्य मंच, नवोदय दिव्यांग संस्था, निगडी, पुणे, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल, नृत्य कला मंदिर, मर्दानी खेळ असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, हेवेन्स स्पोर्ट क्लब, नादवेद संगीत अकादमी, पीक परफॉर्मन्स, निगडी, योगविद्या धाम, पिंपरी चिंचवड, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, जेएसपीएमएस राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डॉ. डी. वाय पाटील इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेसिक म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर लि., संगीत अकादमी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीसीएमसी किक बॉक्सिंग असोसिएशन, पीसीएमसी जिम्नाशियम, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, पर्यावरण संवर्धन समिती, निसर्गराजा मित्र जीवांचे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कार प्रतिष्ठान, युनायटेड भावसार ऑर्गनायजेशन, जलदिंडी अभियान, तुकाराम तनपुरे फाउंडेशन व पोलीस नागरिक मित्र, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, अविरत श्रमदान, थेरगाव सोशल फाउंडेशन, सहगामी फाउंडेशन, पिंपरी चिंचवड सहकारी गृहसंस्था महासंघ, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी, अंघोळीची गोळी, जेष्ठ नागरिक महासंघ, अस्तित्व फाउंडेशन, प्रयत्न सोशल ऑर्गनायजेशन, उन्मुक्त युवा संघटन, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, श्री स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित), आरोग्य मित्र फाउंडेशन, प्रहार क्रांती संघटना (दिव्यांग), चिखली मोशी सहकारी गृहसंस्था महासंघ,रोजलॅंड सोसायटी, लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी, इको पेडलर्स, हंटर्स ग्रुप, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, साई वूड्स हौसिंग सोसा., चंद्रमा रेसिडेन्सी, कुटे सुख वास्तू सोसा., १ हॉलमार्क अवेणू, नक्षत्रं सोसा., रॉयल कासा सोसायटी आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. सुत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.