शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
एकता जेष्ठ नागरिक संस्थेच्यावतीने जेष्ठ नागरिक दिन निमित जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा कार्यसम्राट नगरसेवक वसंत बोराटे यांच्या सहयोगाने रामकृष्ण लॉन्स,मोशी येथे सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत मोठ्या उत्साहित आणि आनंदी वातावरणात पार पडला. कर्यकमास बहुसंख्य सभासद उपस्थित राहिल्यामुळे हॉल खचाखच भरला होता.
प्रमुख पाहुन्यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली. सर्व प्रथम वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा उपस्थीत पाहुण्यांचे हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मान चिंन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. तद्नंतर सप्टेंबर महिन्यातील वाढदिवस असलेल्या सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले त्याच बरोबर नवीन सदस्यांचे सुद्धा गुलाबपुष्प देवून संस्थेच्या परिवारात स्वागत करण्यात आले.
सत्कार समारंभानंतर प्रमुख पाहुणे आणि विशेष अतिथी यांची संस्थेच्या कार्याची प्रशंशा करणारी भाषणे झाली. यात प्रामुख्याने पिंपरी – चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष बागडे साहेब यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शकपर विचार मांडले. वसंत बोराटे यांनी आपल्या भाषणात संस्थेस सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.संस्थेचे अध्यक्ष मनोहर वलोकर आणि भैय्यासाहेब देशमुख यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांतर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच वसंत बोराटे यांच्या कार्याचा गौरव केला.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महासंघाचे अध्यक्ष बागडे साहेब,विशेष अतिथी सर्वश्री निलेश शेठ बोराटे,सागर बोराटे,महासंघाचे कुदळे, संतोषदादा जाधव,परशुराम आल्हाट,ज्ञानेश्वर लांडे तसेच अश्विनीताई जाधव,सारिकाताई बोऱ्हाडे व रुपालिताई आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या दृष्टीने कार्यशील आमदार श्री.महेश दादा लांडगे यांची कर्यकमातील उपस्थिती उल्लेखनीय होती. नितीन गडकरी यांच्या पुणे दौर्यात व्यस्त असूनदेखील आमदार साहेबांनी ज्येष्ठांच्या कार्यक्रमास वेळ दिला ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन्माननीय दादांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे “भारत माता की जय”च्या जयघोषात मंगल पूजन करण्यात आले,भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महेश दादांनी आपल्या भाषणात जेष्ठ नागरिक संस्थेस सदैव सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले,त्याचबरोबर प्रभागातील सर्व नगरसेवकांना जेष्ठ नागरिक संस्थेस प्रथम प्राधान्य देऊन त्यांना वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन केले.
सत्कार समारंभ आणि भाषणानंतर ज्येष्ठांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संस्थेचे हरहुन्नरी ज्येष्ठ गायक कलाकार सर्वश्री सुनील कवडे,प्रदीप चरडे, होमकर काका,लोखंडे आप्पा तसेच गायिका कवडेताई,नेवसेताई व चव्हाणताई यांनी एकापेक्षा एक सरस गीते प्रस्तुत करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन,रूपरेषा,गृपवरील प्रसिद्धी संस्थेचे सचिव श्री.योगीराज देव यांनी अत्यंत सुसुत्रित पणे केली.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,दिप प्रज्वलन करण्यापासून ते आभार प्रदर्शन करण्यापर्यंत संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा.सुभाष कुलकर्णी यांनी अत्यंत बहरदरपणे करून कार्यक्रमाची उंची वाढवली.त्यांनी सूत्रसंचालनाला आपल्या मनोगताची सुरेख जोड देत कार्यक्रमात रंगत आणली.ज्येष्ठांची कर्तव्ये,जीवनातील सकारात्मक विचारसरणीचे महत्व,शेजारधर्म यावर त्यांनी आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले व श्रोत्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
सरतेशेवटी वसुधाताई ईनामदार,श्रीमती नेवासेताई व चव्हाणताई यांच्या सुश्राव्य पसायदान गायनाने समारंभाची सांगता झाली व चहापान आणि अल्पोपहार घेतल्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोहर वलोकार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा.सुभाष कुलकर्णी व योगीराज देव यांच्यासह अन्य कार्यकारिणी सदस्य सर्वश्री भैय्यासाहेब देशमुख,रमेश कुलकर्णी,विजय गवांदे पाटील,श्रीराम भावसार,प्रदीप चरडे,प्रकाश चौधरी, सुभाषसिंग पाटील,अविनाश जोशी,अर्जुन शिंदे आणि सर्व सदस्य व श्री.टकले सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
याप्रसंगी संस्थेस समाजसेवक संतोष बारणे, निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे व नगरसेवक राहुल जाधव यांनी संस्थेस शुभेच्छा दिल्या.