शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरातील युवा सेनेचे अजिंक्य उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी अपंग विद्यालय(रोहन आगरवाल हाॅल)येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले हे रक्तदान शिबीर यशवंतराव चव्हाण रुग्णालय ब्लड बँकेच्या सहकार्याने पार पडले यामध्ये ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले या वेळी ३०० जणांना मास्क, सॅनिटायजगर, वाटण्यात आले
या शिबीराचे उदघाटन शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख महिला आघाडी सौ.सुलभाताई रामभाऊ उबाळे यांनी केले यावेळी कामगार नेते .इरफान सययद उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रक्तदात्यांस टी शर्ट व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री.राजेश जाधव, श्री. मनोज कांबळे,श्री धीरज सावंत, श्री.विजय कांबळे,श्री. संजय पवार, श्री. सचिन चिले,श्री संदिप हजारे व श्री संदिप कोठावळे .यांच्यामार्फत करण्यात आले, यमुनानगर ऑल पॉईंट तर्फे घेण्यात आलेला पहिला कार्यक्रम असून,यापुढे असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा असल्याचे अध्यक्ष श्री.राजेश जाधव यांनी या वेळी सांगितले