शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
आपल्या कर्तुत्वाने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकामध्ये भर घालणा-या माधुरी गरुड, ऋतुराज गायकवाड, ह.भ.प. सतीश महाराज काळजे, प्रसाद पाटील यांचा सत्कार महापालिका सभेमध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह व पुस्तक भेट देऊन करण्यात आला.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य नवनाथ जगताप, नगरसदस्या सिमा चौगुले, माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
माधुरी गरुड यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेमध्ये ५६१ रॅ॑क मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील उत्तीर्ण झालेल्या एकमेव व्यक्ती म्हणून सत्कार करण्यात आला. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या शहरातील नागरिक व उदोयन्मुख खेळाडू ऋतुराज गायकवाड याचा सत्कार त्याच्या आई व वडिलांनी स्विकारला. अध्यात्मिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल , ह.भ.प. सतीश महाराज काळजे यांचा सत्कार करण्यात आला.