शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक करिता आज मतदान होत आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज मतदान होत आहे या निवडणुकीत भाजप वतीने उमेदवारी देण्यात आलेल्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपल्या मतदानाचा हक्क आज पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर बजावला यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते शंकर जगताप यांची मुलगी ऐश्वर्या रेणुसे व कुटुंबीय उपस्थित होते सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे विठ्ठल उर्फ नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे कडवे आव्हान अश्विनी जगताप यांना आहे भाजप वतीने अश्विनी जगताप यांच्या प्रचारात सभा रॅली बैठका अशा अनेक पद्धतीने प्रचाराची रणनीती आखण्यात आली व सक्षमपणे या निवडणुकीत अश्विनी जगताप यांचा प्रचार करण्यात आलेला आहे आज होणाऱ्या मतदानाचा निकाल दोन मार्च रोजी येणार आहे मतदार हा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे आज एकूण 510 मतदान केंद्रावर मतदान होत आहे सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची रांग दिसत आहे मतदान मोठ्या प्रमाणात झाले तर याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो हे दोन मार्च रोजी कळेल च