शबनम न्युज | इंदापूर
“आम्ही आमच्या मुलीचं लग्न कोणत्या जातीत करायचं किंवा कोणाशी करायचं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही,” असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार दत्तात्रय भरणे यांना चांगलेच सुनावलं आहे. इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांमध्ये मुलींना तुम्हाला आम्ही तुमचं लग्न ठरवलेलं चालेल का? असा सवालही केला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ““माझ्या मुलीचं लग्न माझी मुलगी ठरवेल किंवा माझे पती सदानंद आणि मी ठरवू. दादा मामा म्हणून रेवतीचं लग्न कोणाशी करायचं हे ठरवतील. पण भरणे मामा किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे सागू शकत नाहीत. आम्ही मुख्यमंत्री आहोत तुमची मुलगी याच्याशी लग्न करेल, असे ते म्हणू शकत नाहीत. आम्ही आमच्या मुलींना शिक्षण दिलंय. त्यांचे निर्णय त्याच घेतील,” असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.