शबनम न्युज | चिंचवड
“येणारी २ तारीख ही आपलीच असेल. तसेच ही लढत भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाला नक्कीच यश मिळेल,” अशी प्रतिक्रिया चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी मतदानानंतर दिली आहे.
आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील पिके इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
Advertisement