शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आपल्या मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबीयांसमवेत वाकड येथील मतदान केंद्रावर बजावला यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई कमल कलाटे पत्नी वृषाली कलाटे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी करिता सर्वात जास्त चर्चेचे उमेदवार ठरलेले राहुल कलाटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून मतदानाच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार तसेच भाजपचे उमेदवार यांना कडवे आव्हान दिले आहे. पहिल्या दिवसापासूनच राहुल कलाटे यांनी आपण लोक भावनेतून ही निवडणूक लढवीत असल्याचे सांगितले आहे महाविकास आघाडी वतीने तसेच भाजप वतीने अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या उमेदवारासाठी प्रचंड प्रमाणात प्रचार सभा रॅली चे आयोजन केले राहुल कलाटे यांनीही आपल्या प्रचारात कोणतीही कमी ठेवलेली नाही त्यांनीही वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भव्य सभा तसेच प्रचार रॅली कोपरासभा वगैरे घेऊन या निवडणुकीत रंगत आणली आहे आज होणाऱ्या मतदानाचा निकाल हा दोन मार्च रोजी येणार आहे मतदार राजा हा कोणत्या उमेदवाराच्या बाजूने कौल देतो हे येणारा काळ ठरवणार आहे.
राहुल कलाटे यांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क
Advertisement