शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील पिके इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ करिता भाजप वतीने अश्विनी जगताप व अपक्ष राहुल कलाटे या दोन्ही उमेदवारांचे मोठे आव्हान विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासमोर आहे. आज मतदार कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आपला कौल देतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे आज होणाऱ्या मतदानाचा निकाल दोन मार्च रोजी जाहीर होणार आहे विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे ठिकठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या तसेच मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आल्या संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीमय करण्यात आला याचा फायदा विठ्ठल उर्फ नाना काटे यांना किती होतो हे दोन मार्चला स्पष्ट होणार आहे.