शबनम न्यूज
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्या गुरुवारी पदभार सांभाळतील. चाकणकर या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. महा विकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे पद रिक्त होते. ते अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात गेले आणि चाकणकर यांना संधी मिळाली.
Advertisement
रूपाली चाकणकर यांनी आज पर्यंत राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांच्या अत्याचाराविषयी तसेच महिलांच्या विविध अडचणींविषयी नेहमीच आवाज उठविला आहे त्यांना महिला आयोगाचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर नक्कीच त्या गरजू महिलांना योग्य न्याय देतील.
Advertisement