शबनम न्युज | मुंबई
खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेळगाव न्यायालयात राउतांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. राऊतांनी निवडणुकीच्या काळात बेळगाव येथे जाऊन वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात तारखांना हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आला होता.
निवडणुकांचा कार्यक्रम चालू असताना, संजय राऊत हे बेळगाव मध्ये त्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. त्यांनी केलेल्या विधानामुळे निवडणूक आचारसंहिते भंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाखाली त्यांच्यावर कलम 153 ए अन्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्हा संदर्भात सुनावणी सुरू आहे. या तारखांना ते हजर राहू शकले नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, आज झालेला सुनावणीत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.