शबनम न्युज | चिंचवड
“२०१९ ला किती मते मिळाली, यावर उमेदवार ठरत नाही, परिस्थितीनुसार मते प्रत्येक वेळी बदलत असतात,” असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी अजित पवार म्हणाले, “पोटनिवडणुकीतील चिंचवड जागेसाठी उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले; पण एकमत झाले नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा सर्वांशी बोललो. त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. तरीही राहुल कलाटे उभे राहिले तर आमचा अजूनही एकमत करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याशी बोलून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न असेल.” असेही मत अजित पवार व्यक्त केले.
Advertisement