शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आझाद समाज पार्टी वतीने केंद्र सरकार विरोधात निषेध पिंपरीत आंदोलन करण्यात आले. भांडवलशाही वर्गाच्या हितासाठी केंद्रातील बीजेपी सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी कामगार अल्पसंख्यांक बहुजन समाज यांच्याविरोधात मनमानी काळे कायदे पारित केलेले आहेत, या काळ्या कायद्याच्या विरोधात मागील अनेक महिन्यांपासून देशातील शेतकरी हा केंद्रातील बीजेपी सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करत आहे. परंतु सत्तेच्या नशेत हे भांडवल शाही मनुवादी सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्या कडे आंदोलनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि हे आंदोलन बदनाम करण्याचा दडपण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच प्रयत्नातून उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी गावात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यावर गाडी चढवुन त्यांची अमानुषपणे हत्या घडवून आणल्यांचा प्रकार बीजेपीचा केंद्रीय मंत्र्याच्या सुपुत्राने केला. जो अतिशय संतापजनक व निंदनीय आहे, बीजेपी केंद्र सरकारच्या या हुकूमशाही अमानुष कृत्याचा आझाद समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर वतीने आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आले.
जनता व शेतकरी या बीजेपी सरकारला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया रहीम सय्यद यांनी दिली. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आझाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. भाई चंद्रशेखर आजाद, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल प्रधान व शहराध्यक्ष रहीम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनाथ असून भारतीय लोकशाही व संविधानाच्या रक्षणार्थ लोकशाही मार्गाने नेहमीच आक्रमक भूमिकेत राहील असे दिसते.
आंदोलनाचे नेतृत्व शहर अध्यक्ष रहिम भाई सय्यद यांनी केले. तर प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते फिरोज भाई मुल्ला तसेच जिल्हा प्रभारी क्रांती सहाने जिल्हाध्यक्ष रवी राख पसरे तसेच शहर कमिटी उपाध्यक्ष साधू फुलमाळी, महासचिव विजय ओव्हाळ, कामगार नेते रामभाऊ ठोके, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष कुणाल भाऊ सोनवणे तरुण वावळे साधु फुलमाळी शहर उपाध्यक्ष, रावसाहेब काकडे, मयुर कदम भोसरी विधानसभा उपाध्यक्ष, विजय खंडागळे, एकनाथ लोकडे शहर संघटक,नसिम शेख शहर संघटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.