शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या प्रयत्नाने ओम साई सोसायटी, मोरे वस्ती येथे पेविंग ब्लॉक च्या कामाचे भूमिपूजन पार पडले.
Advertisement
यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले की, प्रभागातील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यादृष्टीने नगरसेवक व नगरसेविका नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यास अनुसरून आज ओम साई सोसायटी मोरे वस्ती येथे पेविंग ब्लॉक च्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका साधनाताई मळेकर ,नगरसेविका स्वीनलताई म्हेत्रे, मा.नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे, युवा नेते पांडा भाऊ साने,अंकुश मळेकर ,रुपाली ताई साने ,कपिल म्हेत्रे व राजगड पार्क मधील सर्व नागरिक उपस्थित होते.
Advertisement