शबनम न्युज | पिपंळे सौदागर
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आज माजी विरोधी पक्षनेते, नगरसवेक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने पिपंळे सौदागर मधील गोविंद यशदा चौक ते काटे वस्ती पर्यत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेला विविध विकासकामांची उदा. रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रॅाम वॅाटर लाईन इत्यादी कामांची पाहणी करण्यात आली. तसेच ट्रियॅास सोसायटी व झुलेलाल टॅावर सोसायटी कडे जाणाऱ्या १८ मी. रस्त्याची पाहणी देखील यावेळी नाना काटे यांनी केली.
या रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरूस्त करण्याबाबत नाना काटे यांनी सुचना दिल्या. यावेळी ट्रियॅास सोसायटी चे योगेश सरदेशपांडे, मोहिते काका, सोनवणे काका, किशोर पगरूड, पंकज पालवे, राजेश पाटील, सुनील वाधवा, प्रविण कोहीनकर, प्रमोद बडगुजर, जगदीश सोनवणे, व इतर सोसायटी सदस्य उपस्थित होते. तसेच यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणीवेळी प्रत्येक सोसायटी समोरील इन्ट्री गेट व्यवस्थीत करणे, सोसायटी चे स्ट्रॅाम वॅाटर लाईन, ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याच्या लाईन संदर्भात त्रुटी दुर करून ती कामे लवकरात लवकर पुर्ण करून देण्यात याव्या, अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना नाना काटे यांनी केल्या.
यावेळी साई ॲार्चिड सोसायटी चे परेश महाजन राजकुमार शर्मा, शिदें काका, सतर्के काका, तसेच सिमरण कॅार्नर सोासटीचे चेअरमन राकेश तुलसाणी, मनोज मालपाणी, राकेश तुलसानी, मंगेश सावर्डेकर, हर्षद बापट, मानस सिन्हा तुषार गार्डन फेज २ सोसायटीचे प्रशांत पाटील, महेश शेट्टी, केदार जठार, शिवानंद पटणे, अशोक चव्हाण, तावरे काका, गणेश पार्क सोासटी चे चेअरमन सुनिल मुलचंदानी, जतिन कदम, विनोद उपाध्याय, व इतर सोसायटी सदस्य उपस्थित होते. यावेळी ट्रियॅास, सिमरन कॅार्नर, तुषार गार्डन फेज २, गणेश पार्क, साई ॲार्चिड, साई गार्डन, या सोसायटीच्या वतीने नगरसवेक नाना काटे यांचा सन्मान करण्यात आला. या पाहणी वेळी मनपा स्मार्ट सिटी चे अभियंता कोल्हे, कनिष्ठ अभियंता शिर्के, बी.जी शिर्के कंपनीचे टि.के. चव्हाण, बांदल, गाढवे, धायगुडे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.