शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत पिंपरी-चिंचवड संगीत अकादमी आयोजित ‘दिपावली पहाट 2021 ‘ हा सांस्कृतिक, सांगीतिक व शैक्षणिक उपक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे 5 :30 वाजल्यापासून विनामूल्य आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली आहे.
दिवाळी सण हा सर्वांसाठी आनंदाची पर्वणी असते. सर्व स्तरातील नागरिक हे दिवाळीचा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतात. आगामी दिवाळीचं लक्षात घेता ‘दिपावली पहाट 2021 ‘ या सांस्कृतिक,सांगीतिक व शैक्षणिक उपक्रमाचा दुग्धशर्करा योग जुळून आलेला असून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, शास्त्रीय संगीत क्षेत्रातील शिष्य / विद्यार्थ्यांकरिता खालीलप्रमाणे शास्त्रीय गायन, सतार वादन व सारंगी वादनाचे पहाटे आयोजन करण्यात येत असल्याने पहाटे च्या रांगा चे सादरीकरण व जुगलबंदी अनुभवता येणार आहे.
आयोजित कार्यक्रमाची माहिती –
पहाटे साडेपाच वाजता – संगीत अकादमीच्या सांगीतिक कार्यक्रम
सकाळी साडेसहा वाजता – श्री संगीत मिश्रा व संदीप मिश्रा बनारस यांची सारंगी वादन व जुगलबंदी
सकाळी साडेसात वाजता – उस्ताद शाकीर खां यांचे सतारवादन
सकाळी साडे आठ वाजता – पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन
हे सर्व कार्यक्रम यावेळी घेण्यात येणार असून तेव्हा दिपावली पहाट 2021 या उपक्रमाचा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, शास्त्रीय संगीत क्षेत्रातील शिष्य / विद्यार्थ्यांनी कोरोना संबंधी शासनाच्या सूचना नियम पाळून रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आतील आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सदर सांस्कृतिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम पार पडणार आहे. अशी माहिती सुषमा शिंदे यांनी यावेळी दिली.