शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पिंपरी चिंचवड शहरातील गुंठेवारीतील बांधकामे, घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेची त्वरित अंमलबजावणी करून शहरवासीयांची दिवाळी गोड करा,अशी मागणी मा.विरोधी पक्षनेते, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिपंरी चिचंवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरातील गुंठेवारतील बांधकामे, घरे नियमित करण्यासाठी मागील काही दिवसापुर्वी महाविकास आघाडी सरकार तर्फे शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्या आदेशाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली नव्हती, परंतु आता गुंठेवारीतील घरे, बांधकामे प्रशमन शुल्क व विकास शुल्क स्विकारून नियमितीकरणाबाबत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दि. १८/१०/२०२१ रोजी सुधारित नवीन आदेश (शासि आदेश क्र.गुठेवा-1021/प्र.क्र.48/2021/नवि-३०) काढण्यात आला असून. त्यानुसार आपण आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून एक खिडकी योजनेच्या माध्यमातून नियमितीकरणाची प्रक्रिया चालू करून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करावी, असे हि नगरसेवक नाना काटे यांनी सदर निवेदनात नमूद केले आहे.