प्रभाग क्र.19 लिंक रोड या ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार चे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरउपाध्यक्ष निलेश निकाळजे यांच्या नेतृत्वात करण्यात आले या आठवडे बाजाराचे उद्धाटन पिंपरी विधानसभचे आमदार मा.अण्णासाहेब बनसोडे यांचे चिरंजिव सिद्धार्थ अण्णा बनसोडे व शिक्षण मंडळाच्या माजी उपसभापती लताताई आनंदराव ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला व शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना राबिवण्यात आली.या कार्यक्रमास रिपाई चे जेष्ट नेते आनंदरावजी ओव्हळ,माझे मार्गदर्शक बाळासाहेब रोकडे,आर्यनजी आखाडे तसेच सामजिक कार्यकर्ते सुंदर कांबळे,अनिल सोनवणे,विकास निकाळजे,अनीता सावळे,नितीन ओव्हाळ,संदीप पिसाळ,इंद्राभा,कुणाल गुंजाळ इंद्राभाऊ तसेच निलेश निकाळजे मित्र परिवार मोठ्या संखेने उपस्थीत होता.