शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप ने जो भ्रष्टाचार चालू केला आहे, त्याची ईडी मार्फत चौकशी करावी, यासाठी किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी गेले असता, त्यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी काळे झेंडे व घोषणा देऊन किरीट सोमय्या व भाजपाचा निषेध करून शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख ऍड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोरवाडी येथील भाजपा शहर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शहर प्रमुख ऍड. सचिन भोसले सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, वैशाली मराठे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, शहर संघटक रोमी संधू, भाविक देशमुख, सचिन सानप, विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, अनंत कोऱ्हाळे, महिला संघटिका अनिता तुतारे, सरिता साने, युवा विधानसभा संघटक माऊली जगताप, निलेश हाके, उपशहर प्रमुख तुषार नवले, अमोल निकम, अनिल सोमवंशी, शैलेश मोरे, हरेश नखाते, सुधाकर नलावडे, संतोष पवार, विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, ऋषिकेश जाधव, नेताजी काशीद, संतोष सौंदांकर, दादा नरोडे, विभाग प्रमुख सय्यद पटेल, पार्थ गुरव, संतोष वाळके, गोरख नवघणे, सचिन चिंचवडे, दीपक कांबळे, दत्ताराम साळवी, गोरख पाटील, अनिल पारचा, नितीन बोंडे, विशाल चव्हाण, राजेंद्र तरस, सुदर्शन देसले, कृष्णा वाळके, पंकज दीक्षित, सचिन पवार, नितीन दर्शले, प्रवीण पाटील, किरण पाटील, मंगला भोकरे, शारदा वाघमोडे, शैला पाचपुते, कमल गोडांबे, भाग्यश्री मस्के, शिल्पा अनपण यांनी काळे झेंडे दाखवून भाजपा व किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध केला.
तसेच यावेळी शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व महिला आघाडी युवा सेना शिवसेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.