शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील साने चौक, चिखली येथील ऐश्वर्यम कोर्टयार्ड या सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. पिण्याचे पाईपलाईन ची दुरुस्ती झाली नसल्याने या सोसायटीला सुरळीत पाणीपुरवठा होत नव्हता, या सर्व अडचणी या भागातील युवा नेते पांडा भाऊ साने व सामाजिक कार्यकर्त्या रूपाली साने यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने सदर पिण्याच्या पाईप लाईन ची दुरुस्ती त्वरित करून दिली. या तत्परतेने कामगिरी केल्याने पांडा भाऊ साने व रूपाली साने यांचे सोसायटीच्या रहिवासी असलेल्या नागरिकांनी मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना रूपाली साने यांनी सांगितले की, आपण नेहमीच नागरिकांच्या अडचणी सोडविण्यावर भर देत असतो व यापुढेही अशाच नागरिकांच्या अडचणी सोडवणार असून या प्रभागातील नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षता घेणार आहोत. आम्ही भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे काम सातत्याने करीत आलो आहोत. यापुढेही हे कार्य असेच अविरतपणे सुरू ठेवणार आहोत.