शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (२२ नोव्हेंबर ) :- स्वच्छ महाराष्ट्र/ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२२ सुरु झालेले आहे. सदर अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतु आहे.
स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान अंतर्गत लघुफिल्म (Short film ), गीत(Jingle ), पोस्टर/चित्रकला, शिल्प/भित्तीचित्र(mural) व पथनाटय (Street Play) स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये प्लास्टीक बंदी, कचरा विलगीकरण, परिसर स्वच्छता, 3R- Reduce, Reuse, Recycle (कमी वापर, पुनर्वापर, पुर्नचक्रीकरण), इ. स्पर्धां आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील बाबी प्रामुख्याने विचारात घेण्यात येणार आहे.
- सदर स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे.
- स्पर्धेतील कलेमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे नाव येणे अनिवार्य आहे.
- स्पर्धकांची नाव, संपर्क क्रमांक, वॉर्ड क्रमांक, ई-मेल, स्पर्धेचे नाव, स्पर्धेचा विषय इ. माहिती देण्यात यावी.
स्पर्धकांतुन प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी शुक्रवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सकाळी १०.०० वाजेपर्यंत sbm2020@pcmcindia.gov.in वर आपली कला ई-मेल करावी असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे.