शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ नोव्हेंबर ) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २०१९-२०२० या वर्षात झालेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या ४४ खेळाडूंचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, क्रिडा, कला व सास्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, स्विकृत नगरसेवक माऊली थोरात, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
Advertisement
Advertisement