शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ नोव्हेंबर ) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी उप पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुरानिक आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement