शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ नोव्हेंबर ) :- द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव या शाळेमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरविंद साळवे सर यांनी भूषवले सर्वप्रथम बुद्ध पूजा त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर मुलांनी शाळेची असेंबली सादर केली त्यात त्रिसरण , पंचशील , अष्टांगमार्ग, दहा पारमिता दहा कुशल कर्म, व 22 प्रतिज्ञा सादर करण्यात आल्या , व शाळेचे अधिक्षक आयु.अजित गायकवाड सर यांनी संविधानाचे प्रस्ताविकेचे वाचनकेले यानंतर शाळेचे प्राचार्य आयु. भारत साळवे सर यांनी संविधान दिनाचे महत्व विषद केले शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्रा. साळवे सरांनी भारतीय संविधान किती महत्त्वाचे आहे आणि त्याची जपवणूक करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे सर्वांना सांगितले राहो सुखाने हा मानव इथे या मैत्री गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शाळेच्या सचिव आयु.मनीषा साळवे नितीन सर, प्रतीक्षा मिस व स्टाफ आणि बहुसंख्येने पालक उपास्थित होते.