शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ नोव्हेंबर ) :- २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन निमित्ताने महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेने च्या वतीने सामूहिक संविधान प्रस्ताविका वाचन व वृक्षारोपण चे कार्यक्रम पिंपरी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.शंकर अवताडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मा.मिसाळ साहेब यांचे असते करण्यात आले व मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष अजीज भाई शेख ,फहमिदा जावेद शेख ,संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शाकिर भाई ,शेख पुणे जिल्हा अध्यक्ष हजरा कबिर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मुमताज इनामदार, कोर कमिटी सदस्य कबीर ,संजीवनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इम्रान बेग , केरला मुस्लिम जमात चे सरचिटणीस साहूल हमीद शेख , वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सालार भाई ,शेख सामाजिक कार्यकर्ते असद पटेल, राजूभाई चाऊस,रशीद शेख , मुकिम शेख, फैज शिकलगार, कासिम बागवान रिजवान बेग उपस्थित होते.