शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.३० नोव्हेंबर) :- पिंपरी-चिंचवड शहरातील साने चौक परिसरातील माऊली कृपा सोसायटी, राजगड पार्क 2 ते राजगड पार्क 6 या सोसायट्यांमधील गेली अनेक महिन्यांची ड्रेनेजची समस्या आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे अधिकारी व प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या सहकार्यातून मार्गी लागली.
माऊली कृपा सोसायटी, राजगड पार्क 2 ते राजगड पार्क 6 या सोसायट्यांमधील ड्रेनेज समस्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे अनेक अडचणी सोसायटी धारकांना येत होत्या. येथील रहिवासी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या सगळ्या समस्यांची माहिती या भागातील सामाजिक कार्यकर्त्या रूपाली साने व भाजप युवा नेते पांडा भाऊ साने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच व क्षेत्रीय कार्यालयाचे सभापती नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या सहकार्याने या सोसायटी मधील ड्रेनेजची समस्या मार्गी लावली तसेच नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकून या समस्यांचे निराकरण केले. या सोसायटीमध्ये नागरिकांनी या कार्याबद्दल रूपालीताई साने व पांडा भाऊ साने यांचे आभार व्यक्त केले.