शबनम न्यूज | पुणे (दि.३० नोव्हेंबर) :- राज्य सरकारने 1 डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ओमायक्रॉन विषाणूच्या सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पण शिक्षण विभाग आणि राजेश टोपे यांनी शाळा सुरु होण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.
मुंबई महापलिककेने या विषाणूचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरु होणार नसल्याचे जाहीर केले. पुणे शहरातही आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मनपा हद्दीतील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले कि, पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून १५ डिसेंबरला एकूणच आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल. पुणेकर पालकांनी याची नोंद घ्यावी.