शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.३० नोव्हेंबर) :- माणदेशी उद्योग-व्यवसाय प्रशिक्षणाच्या सहकार्यातून नगरसेविका बारसे ताई यांनी गवळीनगर प्रभागातील महिलांसाठी इन्स्टंट व्हेज नॉनव्हेज मसाले तयार करण्याचि मोफत प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. यात १२७ महिला सहभागी झाल्या होत्या.
महीलांनी प्रशिक्षण वर्गात जे जे काही शिकवलेले आहे ते व्यवस्थित वहीमध्ये नोट करून घेतले. त्यांच्या शंका त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त करून अजून याच्या मध्ये नवीन व्हेरिफिएशन काय करता येईल याबाबत ट्रेनर स्वरा यांच्याशी चर्चा केली.
तसेच नगरसेविका प्रियांका बारसे यांच्याकडे हा प्रशिक्षण वर्ग आम्हाला आवडला असून चायनीज पदार्थांचा असाच एक प्रशिक्षण वर्ग आमच्यासाठी आयोजित करावा अशी महिलांनी मागणी केली .
तसेच या करोना व महागाईच्या काळात मुलांना – कुटुंबाला हॉटेलमध्ये गेल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही तसेच खर्चही जास्त होतो अशावेळी हॉटेल सारख्या रेसिपी आपण जर घरात बनवू शकलो आणि कुटुंबियांना देऊ शकलो तर तो आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे अशा महिलांनी भावना व्यक्त केल्या व नगरसेविका बारसेताई यांचे आभार मानले.
या प्रशिक्षण वर्गासाठी अंजली पाटील माणदेशी फाउंडेशन च्या असिस्टंट को-ऑर्डिनेटर भोसरी शाखा तसेच प्रतिभा पवार प्रियांका भोसले फील्ड ऑफिसर व स्वरा रसाळ ट्रेनर यांनी सहभाग घेतला .या कार्यक्रमाच्या वेळी नगरसेविका प्रियांका बारसे प्रभाग अध्यक्षा अनुराधा ताई दौंड व महिलावर्ग बहुमोल वेळ देऊन उपस्थित राहिल्या त्या बद्दल नवले ताई यांनी सर्वांचे आभार मानले.
या वर्गात जे काही प्रशिक्षण देण्यात आलेल आहे त्याच्या रेसिपीज व नोटस व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पीडीएफ रूपाने व व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना परत एकदा देण्यात येणार आहे .
तसेच ज्या महिला या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या त्या सर्व महिलांचे मोबाईल भेट स्वरुपात १००रूपयाने रिचार्ज करून मिळणार आहेत. तसेच जर कोणाला घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर माणदेशी उद्योग समूहातर्फे या महिलांना पाच हजाराची बिनव्याजी कर्ज रुपाने मदत करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक सहभागी महिलेला या प्रशिक्षण वर्गाचे सरकारी प्रमाणपत्र पुढील आठवड्यात देण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेविका प्रियांका बारसे यांनी दिली.