शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी : सध्या नवरात्र उत्सव निमित्ताने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे, या नवरात्र उत्सवानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी मंडप उभारणी करण्यात आली आहे. सदर मंडप उभारणी करते वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने परवानगी घेण्याची प्रक्रिया ही सुरू आहे, सदर नवरात्र उत्सवानिमित्त मंडप उभारणी करिता महानगरपालिका वतीने शुल्क आकारले जाते, हे शुल्क माफ करावे व नवरात्र उत्सवानिमित्ताने उभारण्यात आलेल्या मंडपाचे भाडे आकारले जाऊ नये .अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे युवक शहराध्यक्ष शेखर चंद्रकांत काटे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड शहरात नवरात्र उत्सव सणानिमित्त जे मंडप उभारले जात असतात त्या मंडपाचे भाडे माफ करण्यात यावे ज्याप्रमाणे गणेशोत्सवात मंडपाचे भाडे माफ करण्यात आले होते त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्ताने उभारण्यात आलेल्या मंडपाचे भाडे आकारले जाऊ नये.
राष्ट्रवादी वतीने सदर निवेदन देताना शेखर कांटे यांच्यासोबत शहरातील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेविका माया बारणे, युवा नेते प्रसाद कोलते यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.