शबनम न्यूज | पुणे
मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन्स लि.आणि महोगनी विश्व ॲग्रो प्रा.लि.च्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवदे , मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक भगतसिंग शेळके,मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन्स संचालिका सोनाली शेळके यांच्या हस्ते सोमवारी झाले.सर्व जिल्हा प्रतिनिधी,सहकारी कर्मचारी,शेतकरी उपस्थित होते.संचेती रुग्णालयाजवळ कुंदन चेम्बर्स,शिवाजीनगर,पुणे येथे हे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले असून तेथे माहिती आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.महोगनी वनशेतीची माहिती देण्यासाठी हेल्पलाइनचे उदघाटन यावेळी करण्यात आले असून शेतकऱ्यांना ९१७५१३१४५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजीनियरिंग सर्विसेस (पुणे ) आणि महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. यांनी संयुक्त उपक्रद्वारे महोगनी वनशेती संकल्पना आणली असून शेतकऱ्यांना महोगनी वनशेतीसाठी प्रोत्साहित करून सल्ला,सेवा आणि मार्गदर्शन देण्यात येत आहे.यावेळी बोलताना आनंद चलवदे म्हणाले, “मिटकॉन स्थापनेपासूनच हवामान बदल/ शाश्वत विकास ध्येय क्षेत्रात व नूतनीकरणक्षम ऊर्जा, कार्बनचे प्रमाण कमी करणे , जैवइंधन, ऊर्जा कार्यक्षमता इत्यादी क्षेत्रात अग्रेसर आहे आणि विविध उपक्रमातून हे काम पुढे सुरु राहील ‘.
मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक भगतसिंग शेळके म्हणाले, “ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या शेतकरी व शेतीच्या शाश्वत विकास, निरोगी पर्यावरणासाठी, लोक सहभागातून मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड कार्यरत राहील.शेतकरी समुदायाच्या सहभागाद्वारे मिटकॉनच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करेल. आमच्या विविध प्रकल्पांतर्गत संपूर्ण भारतात ५० कोटींहून अधिक झाडे लावली जातील आणि शेतीचे उत्पन्न सुधारण्यात आणि स्थिर होण्यास हातभार लागेल.“