शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०८ डिसेंबर) :- क क्षेञिय कार्यालय प्रभाग क्र.०२, मौजे- जाधववाडी, कुदळवाडी येथे दि.०७/१२/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंञण विभागामार्फत जाधववाडी, कुदळवाडी मधील गट.नं. ६८८ पै. व ६८० पै. ३०.०० मी. डि.पी. रस्त्याने बाधित असलेले अनधिकृत बांधकामे ( पत्राशेड) इत्यादीवर निष्काशनाची कारवाई करणेत आली. सदर कारवाईमध्ये एकूण १२ पत्राशेड, ०४ वीट बांधकाम, ०२ आर.सी.सी. बांधकाम निष्कासित करणेत आले. सदर कारवाईचे एकूण क्षेञफळ अंदाजे ३८,००० चौ.फु. आहे.
सदर कारवाई मा.सहशहर अभियंता श्री. मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता, श्री. संजय घुबे, क क्षेत्रीय अधिकारी श्री. अण्णा बोदडे यांचे मार्गदर्शनाखाली उप.अभियंता, श्री. सुर्यकांत मोहिते, उप अभियंता श्री. सुधीर मोरे क. अभियंता श्री. अमोल पडलवार व इतर ४ कनिष्ठ अभियंता, १२ बिट निरीक्षक, क व फ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण विभागाचे २८ पोलिस कर्मचारी, चिखली पोलिस स्टेशनचे पी.एस.आय – १, पोलीस कर्मचारी – ०५, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षारक्षक – ५८, अग्निशामक दलाचे पथक व वैद्यकिय विभागाची रुग्णवाहिका, विद्युतविभागाचे कर्मचारी, मजूर – २५, जे.सी.बी – ५, पोकलेन – २, डंपर – ०३ गॅस कटर – १, क्रेन – २ यांचे सहाय्याने करण्यात आली.