शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०८ डिसेंबर) :- पार्थ पवार फाऊंडेशन च्या वतीने व महाराष्ट्र राज्य हौशी मुष्टियुद्ध संघटनेच्या मान्यतेने शेतकऱ्यांचे कैवारी,देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आदरणीय शरदचंद्रजी पवार गौरव पुरस्कार २०२१ मुष्टियुद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
त्याप्रसंगी संयोजक नगरसेवक राजाभाऊ बनसोडे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्राजक्ताताई कांबळे,अॅलेक्स दास,आकाश बोरावडे,निशांत कामठे उपस्थित होते.
त्याप्रसंगी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज या खेळाडूंना बाॅक्सिंग करताना पाहत असताना मला प्रत्येक मुलींमध्ये मेरी कोम व मुलांमध्ये विजेंदर सिंग यांची छबी पहावयास मिळाली प्रत्येकजण जिद्दीने खेळत आहे अशीच जिद्द व चिकाटी अंगी बाळगली तर नक्कीच मुष्टियुद्धामध्ये सुवर्ण पदक मिळवल्याविना आपन राहणार नाही व सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.