शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१० डिसेंबर) ;- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या वतीने, पुणे जिल्हा अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन यांच्या मान्यतेने आणि सी.टी.ओ. कार्यालय व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांच्या सहकार्याने आयोजित पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धचे दिनांक १० ते १४ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर हिरा नानी घुले, क्रीडासभापती उत्तम केंदळे , क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे , नगरसदस्य विलास माडिगेरी, नगरसेविका सीमा सावळे सहाय्यक आयुक्त सुषभाताई शिंदे आदी उपस्थित होते.
उपमहापौर हिरा उर्फ नानी घुले म्हणाल्या, कोरोना संकट काळामध्ये खेळाडूंना त्रास झाला. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणूचे संकट अजूनही संपले नसून खेळाडूंनी काळजी घेणे आवश्यक आहे. शहरामध्ये पुन्हा एकदा क्रीडा संस्कृती वाढवण्याचे काम महानगरपालिका करित आहे. सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन स्पर्धा सुरक्षित पर पाडाव्यात असेही त्या म्हणाल्या.
यावेळी क्रीडा सभापती उत्तम केंद्ळे यांनी खेळाडूंना स्वच्छतेची शपथ दिली. प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी प्रास्ताविक केले. क्रीडापर्यवेक्षक अशोक पटेकर यांनी आभार मानले.
पहिल्या फेरीचा निकाल खालीलप्रमाणे
अ.क्र. स्पर्धकाचे नाव निकाल
१. शुभम गाडगे वि.वि. वैभव कोटणीस (१५-३/१५-४)
२. सौरभ राय वि.वि. महंमद आतार (१५-८/१५-३)
३. श्रेयस गायकवाड वि.वि. मुकेश उत्तेकर (१५/-३/१५-४)
४. मंगेश बेरड वि.वि. दर्शन घोंगडे (१५-१०/१५-८)
५. जावेद शेख वि.वि. अजिंक्य देशमुख (१५-११/१५-१२)
६. कनिष्क चव्हाण वि.वि. मंगेश सकपाळ (१५-१/१५-१)
७. आकाश सांडभोर वि.वि. शिवराज नलावडे (१५-३/१५-३)
८. तुषार कोल्हे वि.वि. अमोल गायकवाड (१५-५/१५-४)
९. अभिजित कन्हेरे वि.वि. आशिष जमदाडे (१५-१/१५-२)
विजय स्पर्धकांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.