शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुण्यात एका कबड्डीपट्टू 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातूनकोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स इथं ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा, अप्पर, बिबवेवाडी) असं मृत तरुणीचं नाव आहे,नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय सांगली इथे भरती शहरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आणि आशा दभाव आणि प्रचंड तणावाच्या वातावरण असताना तेथील पी आय सौ अनिता हिरवकर मॅडम व गुन्हे शाखेची टीम बिबवेवाडी पोलीस यांनी बड्या शितापीने आरोपीना 12 तासात अटक केली याबद्दल भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महासचिव महा,राज्य अजित संचेती ,दीपक पिंपळे,नवनाथ गापाट, ओंकार यांनी बिबवेवाडी पोलीसच्या पी आय सौ अनिता हिरवकर व गुन्हे शाखेच्या टीम चा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले व आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली .
यावेळी अजित संचेती म्हणाले की, पोलिसांबद्दल जनतेच्या मनात होणारे गैरसमज दूर व्हावेत , यासाठी आम्ही जे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे उत्कृष्ट काम करतील अशा अधिकारी व त्यांच्या टीम चे सत्कार आणि अभिनंदन करणार यामुळे जनतेच्या मनातले कटुता दूर होईल व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना यामुळे अजून जोमाने काम करण्याची ओढ व प्रोत्साहन मिळेल.