शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रहाटणी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आदरणीय शरद पवार साहेबांनी मार्गदर्शन करत असताना,पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा बदलण्यासाठी ज्यांनी काम केले त्यांच्याच हातात परत हे शहर सोपवा. राष्ट्रवादीच्या हातात पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी सोपवा जे लोक या शहराची लूट कऱण्याचे काम करतात त्यांना खड्यासारखे बाजुला करा,असे आवाहन केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व ताकदीनिशी मैदानात उतरून महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा झडकविण्याचा आदेश सर्व कार्यकर्त्यांना शरद पवार साहेबांनी दिला.
साहेब हे अजब रसायन आहे,त्यांचा ज्यास परिस्पर्श होतो त्या व्यक्तीच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहतं नाही. शरद पवार साहेबांच्या आजच्या केवळ भाषणाने शहरातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
कोणत्याही पक्षाचा मूळ पाया हा त्यांचा कार्यकर्ता असतो,याच कार्यकर्त्यांच्या ताकदीवर व आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरासाठी केलेल्या कामाच्या जोरावर येत्या महानगरपालिका निवडणूकीत पक्षाचा झडकल्याशिवाय राहणार नाही. यावेळी आजच्या या मेळाव्यास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,खा.डॉ.अमोल कोल्हे,आ.अण्णा बनसोडे,मा.आ.विलास लांडे,मा.महापौर आझमभाई पानसरे,महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.