शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१२ डिसेंबर) :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद चंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस आज संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने, कार्यकर्ता तसेच लोकप्रतिनिधी वतीने साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवराज पवार यांच्या वतीने चिखली कुदळवाडी भागात हजारो असंघटित कामगार यांच्या उपस्थितीत केक कापून व लाडू वाटून मोठ्या आनंदात व उत्साहात शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी युवराज पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष यश दत्ता काका साने, प्रदीप आहेर, विशाल आहेर, विक्रम देसाई, विश्वनाथ येरोळे, सुहास गायकवाड, विशाल जाधव, धोंडीबा मोरे, योगेश पवार, गणेश पवार, कृष्ण पवार व हजारो असंघटित कामगार यावेळी उपस्थित होते.