शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१२ डिसेंबर) :- मा.ना .शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कार्डियाक किट वाटप करण्यात आले.
आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कार्डियाक वाटप प्रभाग क्रमांक ९ येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे करण्यात आले.
मा.महापौर व विद्यमान नगरसेविका डॉ.वैशाली घोडेकर (लोंढे) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मा.राहुलभाऊ भोसले ( मा.विरोधी पक्षनेते / नगरसेवक )प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
ओम हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ श्री सुनील अगरवाल यांचे सहकारी डॉ.कन्हया यांनी कार्डियाक किट व ह्रदयरोगाबद्दल माहिती सांगितले तसेच CDS जनरल बिपीन रावत व त्यांचे सहकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुंडाप्पा टेकूर ,उपाध्यक्ष शिवाजी खराबी , सचिव रमेश कानिटकर ,पोपट आढाव , गोरख भापकर ,काशीनाथ बढळकर,अमरसिंग परदेशी ,आणि सुभाष जाधव उपस्थित होते.