गजाला सय्यद
शबनम न्यूज | अहमदनगर (दि.१२ डिसेंबर) :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
या आरोग्य शिबिरात जनरल आरोग्य तपासणी शिबिर व डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनरल आरोग्य तपासणी शिबिर दि. 14 ते 21 डिसेंबर 2021 रोजी प्रत्येक गावात होणार असून डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर दि. 22 ते 23 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय जामखेड तसेच कर्जत व जामखेड येथील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात (चापडगाव, बारडगाव, कुळधरण, मिरजगाव, राशीण, अरणगाव, नान्नज ,खर्डा ) येथे होणार आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या वाढदिवसानिमित्त #KJIDF आणि ZP यांच्यावतीने १४ ते २१ डिसेंबरदरम्यान कर्जत-जामखेडमधील प्रत्येक गावात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. pic.twitter.com/gCnPZvbu7p
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2021
Advertisement
जनरल आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग, दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांचे आजार, अस्थीरोग यांसारख्या आजारांवर तपासणी करण्यात येणार आहे. तसेच डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर मध्ये डोळे तपासणी, चष्मे वाटप (उपलब्धतेनुसार), मोतीबिंदू, तिरळेपणा या सर्व आजाराबाबत प्राथमिक तपासणी करून तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार करण्यात येणार आहेत. तसेच ज्यांना आवश्यक आहे त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये शासकीय योजनेमार्फत शस्त्रक्रिया करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. तसेच या शिबिराचे लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
तसेच या आरोग्य शिबिरामध्ये डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप, वंध्यत्व /अपत्यप्राप्ती न होणे, दात जबडा सर्जरी, ओठ दुभंगणे व फाटणे, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी, अपंगत्वाचा दाखला मिळणेबाबत, महिलांचे आजार या सर्व आजारांबाबत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. तरी आपणास याचा लाभ घ्यायचा असल्यास जनरल आरोग्य शिबिरामध्ये नाव नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 9696330330 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे ही आवाहन करण्यात आले आहे.