शबनम न्यूज : पुणे (दि.१४ डिसेंबर ) :- पुणे महानगरपालिका क्षेत्रात १६ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे.
पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (१६ डिसेंबर, २०२१) सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी. असे मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले आहे.
पुण्यातील १ ली ते ७ वीचे वर्ग गुरुवारपासून !
पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (१६ डिसेंबर, २०२१) सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/Kvse0mrGeL
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 14, 2021
Advertisement