शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१५ डिसेंबर) :- मागील काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत, आता पाणीपुरवठा सुरळीत व्हावा ही संपूर्ण पिंपरी-चिंचवडकर शहरवासीयांची मागणी आहे. या मागणीला अनुसरूनच पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड करांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा नाही तर यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात व तीव्र असे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी वतीने देण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी वतीने या आंदोलनादरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय वाघेरे पाटील, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्ष नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेविका महिला शहराध्यक्षा वैशालीताई काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, प्रवक्ते फजल भाई शेख, रशीद भाई सय्यद, संभाजी बारणे नगरसेवक मयूर कलाटे, नगरसेवक शाम लांडे नगरसेवक पंकज भालेकर ,राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सुगंधा पाषाणकर, नगरसेविका स्वाती माई काटे, नगरसेविका निकिता कदम, नगरसेविका गीता मंचरकर, पदाधिकारी सारिका पवार, गंगा ताई धेंडे, माजी नगरसेविका शमीम पठाण, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे ,नगरसेवक संजय वाबळे, नगरसेवक राजू बनसोडे, पदाधिकारी कविता खराडे, प्रसाद कोलते,शकरुल्ला पठाण, विजय लोखंडे ,अल्पसंख्यांक सेलचे युसुफ कुरेशी व शहरातील प्रमुख नेते मंडळी तसेच आजी माजी नगरसेवक नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते.