शबनम न्युज (आळंदी) प्रतिनिधी मल्हार काळे :
आळंदी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आयोजित ओळख ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम उपक्रमाचे चर्चासत्र प्रमुख विश्वस्त यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास मध्ये पार पडले या चर्चासत्रामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश शेठ काळे यांनी ओळख ज्ञानेश्वरीची विषयी प्रस्ताविक माहिती द्वारे मनोगत व्यक्त केले श्री ज्ञानेश्वर शिक्षक संस्था सचिव अजित वडगावकर यांनी श्री ज्ञानेश्वर विद्यालयात या उपक्रमाबद्दल माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले तसेच या चर्चासत्रात ओळख ज्ञानेश्वरी मध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जे शिक्षण घेत असताना स्वतःमध्ये घडलेले बदल त्यामध्ये अभ्यासात एकत्र आता सामाजिक पणा श्रवण व संस्कार याबद्दल माहिती दिली प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी ओळख ज्ञानेश्वरी या उपक्रमाचे संपूर्ण पालकत्व संस्थांनी स्वीकारले आहे हा उपक्रम पुढेही संस्कार मार्फत चालू राहील तसेच अनेक शिक्षण संस्था याबाबत बोलणे चालू असून त्या सहभागी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विश्वस्त विकास ढगे पाटील यावेळी म्हणाले हा उपक्रम जिल्हास्तरीय तालुकास्तरीय सर्व शाळा शिक्षण संस्था यामध्ये राबविण्यात यावा यासाठी पुढे पिंपरी चिंचवड आयुक्तांसमोर मांडण्यात येईल एस जी मुंगसे दीपक मुंगसे यांनी या उपक्रमा संदर्भात यावेळी उपस्थित त्यांना माहिती दिली ओळख ज्ञानेश्वरी उपक्रम शिकवणारे अध्यापक श्रीधर गुंडरे यांनी या उपक्रमातील अभ्यासक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओळख ज्ञानेश्वरीची अध्यापक उमेश बागडे यांनी केले तसेच त्यांनी आजी-माजी शिक्षक वारकरी शिक्षण संस्थेतील मान्यवरांना आव्हान केले की या उपक्रमात सहभाग घ्यावा संस्कार क्षमा विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्याला ज्ञानदानाची सेवा ही या उपक्रमाला लाभावी ओळख ज्ञानेश्वरी ची या संस्कारक्षम उपक्रम चालू होण्यासाठी सुमारे 50 शाळेने चर्चासत्र दरम्यान नाव नोंदणी केली आहे जून महिन्यात या उपक्रमाची सहभागी शाळेंमध्ये सुरुवात होईल असे यावेळी त्यांनी सांगितले या चर्चासत्राच्या कार्यक्रमात बहुल धानोरी रासे मरकळ राजगुरुनगर चिंबळी बालेवाडी इंदापूर बारामती या ठिकाणच्या शिक्षण संस्थेतील पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते तसेच व्यवस्थापक माऊली वीर तुकाराम गुजर शिवाजी खांडेकर एडवोकेट विष्णू तापकीर व इतर मान्यवर उपस्थित होते.