शबनम न्युज | मुंबई
व्हाट्सअप ने आपल्या युजर साठी चॅटिंगची गंमत वाढवण्यासाठी सातत्याने नवनवीन पिक्चर आणत असते आणि काही जुने फीचर्सही बंद केले जातात. एक वर्षापूर्वी बंद करण्यात आलेल्या एक फीचर व्हाट्सअप ने पुन्हा लॉन्च केले आहे. View Once असे ह्या फीचर्स चे नाव आहे. ज्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. या फीचर्समध्ये युजर्स फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकतात.जे एकदा पाहिल्यानंतर गायब होतात.
View Once हा फीचर्स व्हाट्सअप ने एक वर्षांपूर्वी डेस्कटॉप युजर साठी बंद केले होते. आता हे फीचर पुन्हा परत येत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी देखील लवकरच व्हाट्सअप मध्ये सपोर्ट येणार आहे. त्याचे टेस्टिंग बीटा व्हर्जनल वर केलं जात आहे. बीटा युजर्सने त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. रिपोर्टनुसार व्हाट्सअप चे हे नवीन अपडेट सध्या अमेरिकेतील बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे.